२५ जानेवारीला ‘ठाकरे’ व्यतिरिक्त दुसरा सिनेमा चालणारच नाही…

टीम महाराष्ट्र देशा : बुधवारी ‘ठाकरे’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर दिवसभर चर्चा रंगल्या. आज पुन्हा शिवसेनेच्या चित्रपट सेनेचे सरचिटणीस बाला लोकरे यांची फेसबुक पोस्ट चर्चेत आली आहे. येत्या २५ जानेवारीला ठाकरे सिनेमा व्यतिरिक्त दुसरा कोणताही सिनेमा चालणार नाही अशी धमकीवजा पोस्ट त्यांनी टाकली आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असल्याने आम्ही त्यावर ठाम आहोत.ही सर्व शिवसैनिकांची व बाळासाहेबांवर प्रेम करणाऱ्यांची इच्छा आहे.त्यामुळे त्यादिवशी इतर कोणताही चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा लोकरे यांनी दिला आहे.२५ जानेवारीला ठाकरे चित्रपट हा मराठी आणि हिंदीत प्रदर्शित होणार आहे.

झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारीत कंगणाची भूमिका असलेला ‘मणकर्णिका’ आणि इम्रान हाश्मीची मुख्य भूमिका असलेला ‘चीट इंडिया’ चित्रपट ही त्याचदिवशी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे शिवसेना चित्रपट सेनेच्या इशाऱ्यानंतर आता बॉलिवूड चित्रपट माघार घेतील का हे बघावे लागणार आहे.

You might also like
Comments
Loading...