२५ जानेवारीला ‘पद्मावत’ प्रदर्शित होणार

टीम महाराष्ट देशा : संजय लिला भन्साळी यांचा बहुचर्चित ‘पद्मावत’ हा चित्रपट २५ जानेवारीला प्रदशिर्त होणार आहे. सुरवातीपासूनच वादाच्या कचाट्यात अडकलेल्या या चित्रपटाच्या नावात आणि गाण्यांमध्ये बदल केल्यानंतर सेन्सॉरकडून प्रदर्शनाला परवानगी देण्यात आली आहे. सेन्सॉर बोडॉकडून शुक्रवारी २ तास ४३ मिनिटांची वेळ असलेल्या पद्मावतला U/A प्रमाणपत्र देण्यात आले.

चित्रपटाचे नाव पद्मावती होते ते पद्मावत असे केले असून चित्रीकरणापासून वादाला सामोरे जावे लागले आहे. कधी सेट जाळण्यात आले तर कधी कलाकरांना धमक्या देण्यात आल्या. हा चित्रपट १ डिसेंबरला रिलीज होणार होता. पण, रजपूत करणी सेना आणि मारवाडी समाजाचा वाढता विरोध लक्षात घेता याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले होते. अखेर चित्रपट प्रदर्शनाची तारीख निश्चित करण्यात आली आहे.