15 ऑगस्टला मदरशात तिरंगा आणि राष्ट्रगीत बंधनकारक

वेबटीम : एका बाजूला काही मुस्लीम नेत्यांनी ‘वंदे मातरम’ म्हणण्यास विरोध सुरु केला आहे. तर दुसरीकडे आता येत्या 15 ऑगस्ट रोजी उत्तर प्रदेशात सर्व मदरशात तिरंगा फडकावणे आणि राष्ट्रगीत गाण बंधनकारक करण्यात आलं आहे.

मदरसा शिक्षण परिषदेने उत्तर प्रदेशातील सर्व मदरशांना याचे निर्देश दिले आहेत. एवढच नाही तर मदरशांना या कार्यक्रमाचं व्हिडीओ शूटिंग आणि फोटो काढण्यास देखील सांगण्यात आले आहे.

up madrasa
मदरसा शिक्षण परिषदेचे पत्र