१३ डिसेंबर रोजी पश्चिम व मध्य रेल्वे मार्गावरील सुविधांचे उद्घाटन

मुंबई : पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावर नव्याने पुरवण्यात आलेल्या सुविधांचे उद्घाटन बुधवारी १३ डिसेंबर रोजी होणार आहे. रेल्वे राज्यमंत्री राजन गोहेन यांच्या हस्ते या सुविधांचे उद्घाटन होणार आहे. या सुविधांमध्ये पादचारी लिफ्ट, सरकते जिने, लिफ्ट, प्रसाधनगृह, पादचारी पूल आदींचा समावेश आहे. मध्य रेल्वेवरील करी रोड स्थानकातील नवीन पूलाचे काम पूर्ण झाले असून अद्याप तो पादचाऱ्यांसाठी खुला झालेला नाही. गोहेन यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन होणार आहे. त्याशिवाय मध्य रेल्वेवरील दादर, कल्याण, एलटीटीतील पाच सरकते जिने, टिटवाळा-ठाकुर्ली येथील प्रत्येकी एका लिफ्टचे उद्घाटन होणार आहे.