बीड: बीडमधील शिवसंपर्कअभियानादरम्यान शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि आमदारांवर जोरदार टीका केली आहे. “उस्मानाबादेत आमचा पालकमंत्री आहे. तिथे महाविकास आघाडीचा फॉर्म्युला आम्ही तिथे पाळतो. मात्र बीडमध्ये उलट असल्याचं म्हणत त्यांनी थेट धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागरांवर निशाणा साधला आहे.
ADVERTISEMENT
“तुम्हाला आम्ही डिस्टर्ब करत नाहीये त्यामुळे कृपा करुन आम्हाला डिस्टर्ब करायच्या भानगडीत पडू नका, ही कळकळीची विनंती आहे. दोन हात करायची वेळ आली तर कोणताच शिवसैनिक तिथे कमी पडणार नाही”‘ असा थेट इशारा निंबाळकर यांनी संदीप क्षीरसागर यांना दिला आहे.
महत्वाच्या बातम्या: