fbpx

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना-भाजपकडून ओमराजे उमेदवार ?

उस्मानाबाद / प्रतिनिधी : उस्मानाबादचे माजी आमदार ओमप्रकाश पवनराजे निंबाळकर यांना मातोश्री वरुन येत्या लोकसभा निवडणुकीसाठी कामाला लागण्याचे आदेश पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दिले आहेत. ओमराजे यांनी केलेल्या समाजउपयोगी कार्य व नागरीकांमध्ये सध्याच्या नेतृत्वावर असलेला असंतोष यामुळे ही निवड झाल्याचे विश्ववसनिय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार समोर आले आहे.

कै.पवनराजे यांचे सुपुत्र ओमराजे निंबाळकर हे २००९ साली कळंब-धाराशिव विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. २०१४ साली त्यांना निसटता पराभव पत्करावा लागला पण मधील काळात त्यांनी शिवसैनिकांची एक मजबुत फळी उभा केली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात शिवसेनेमध्ये दोन गट पडले आहेत. दोन्ही गट लोकसभेच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ओमराजे यांच्या उमेदवारीला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिरवा कंदील दाखवल्याच कळतय. नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी जिल्हापरिषद सदस्या यांच्या प्रवेशादरम्यान धाराशिव जिल्ह्यातील शिवसेनेचे काही नेते मातोश्रीवर हजर होते. त्यावेळी त्यांना ही उमेदवारीची माळ गळयात पड़ल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.