‘त्यांना दुध आणि लोण्यातील फरक तरी कळतो का’ ? ओमराजेंचा राणा पाटलांना जोरदार टोला

rana patil and omraje nimbalkar

उस्मानाबाद : दुध दरवाढीच्या मागणीसाठी भाजपसह मित्रपक्षांनी 1 ऑगस्टला जोरदार आंदोलन केले. मात्र आता या आंदोलनावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलच राजकीय द्वंद्व रंगताना पाहायला मिळत आहे. यामध्ये आता कट्टर राजकीय विरोधक असणारे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यात चांगलाच सामना रंगल्याने उस्मानाबाद जिल्ह्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

उस्मानाबादमध्ये दूध दरवाढीच्या आंदोलनावरून राजकारणाला पेटले आहे. काल भाजपच्या वतीने तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रतिकात्मक कृष्णाला लोणी चारून दूध दरवाढ आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान राणा पाटील यांनी हातात रवी घेत लोणी बनवण्याचाही प्रयत्न केला होता.

महानायक अमिताभ बच्चन यांनी कोरोनाला हरवलं, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

मात्र ज्यांना दुधाचा व लोण्यातील फरकही कळत नाही, अशानी आंदोलनाचा स्टंट केला. जिल्ह्यातील दुध संघ ज्यांच्यामुळे बंद झाला त्याच्या नेतृत्वाखाली दुधाचे आंदोलन व्हावे यापेक्षा हास्यास्पद गोष्ट नाही., राज्य सरकारच्या नावाने ओरड करण्यापेक्षा केंद्राकडून मदत आणण्यासाठी प्रयत्न करावे असा सल्ला देत जोरदार कोपरखळी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे नाव न घेता मारली आहे.

दरम्यान, भाजप दूध आंदोलनाच्या मुद्द्यावरून रस्त्यावर उतरल्यानंतर विविध जिल्ह्यांमध्ये सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले. पश्चिम महाराष्ट्रात सदाभाऊ खोत यांच्या संघटनेनं आक्रमक आंदोलन केल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी टीका केली. त्या टीकेला सदाभाऊ खोत यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिल्याने वातावरण तापलं आहे.

मोठी बातमी : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण…

IMP