नवी दिल्ली: जगभरात गेल्या काही महिन्यांपासून ओमायक्रॉन या विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरत आहे. कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत आता पुन्हा एकदा वाढ होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण बघायला मिळत आहे. ओमायक्रॉनच्या बाबतीत मात्र AIIMS ने दिलासादायक माहिती दिली आहे. ओमायक्रॉन व्हेरियंटचा प्रभाव सौम्य असल्याची माहिती AIIMS चे संचालक रणदीप गुलेरिया यांनी दिली आहे.
गुलेरिया यांनी माहिती देताना सांगितले की, अत्यंत संसर्गजन्य ओमायक्रॉन व्हेरियंट मुख्यत्वे वरच्या श्वसनमार्गावर आणि वायुमार्गांवर परिणाम करतात. फुफ्फुसांवर याचा अधिक संसर्ग होत नाही. त्यामुळ ज्यांना ब्लड प्रेशर, मधुमेह किंवा इतर आजार नाहीत त्यांनी घाबरून जाऊ नये, अशी माहिती गुलेरिया यांनी दिली आहे. ताप, सर्दी, घसा खवखवणे आणि खूप अंगदुखी आणि डोकेदुखी ही लक्षणे ओमायक्रॉनमध्ये प्रामुख्याने आढळतात. यापैकी कोणतीही लक्षणे कायम राहिल्यास संशयित रुग्णांनी स्वतःची तपासणी करून घेण्याचे आवाहन देखील गुलेरिया यांनी केले आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, जीनोमिक सीक्वेंसिंगद्वारे १ हजार २७० ओमायक्रॉनचे रुग्ण सापडले आहेत. यापैकी ३७४ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. गुलेरिया यांनी सांगितले, घाबरण्याची गरज नाही. हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की, या नवीन प्रकारामुळे ऑक्सिजनमध्ये घट होत नाही. म्हणून, ज्यांना इतर आजार नाही त्यांनी गृह विलगीकरणावर भर द्यावा. घाबरुन हॉस्पिटलमध्ये बेड ब्लॉक करणे आवश्यक नसल्याचे देखील गुलेरिया यांनी स्पष्ट केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- मराठवाड्यातील जनतेला नववर्षाच्या सुरुवातीला रावसाहेब दानवेंनी दिले ‘हे’ गिफ्ट..!
- ‘सत्तेची खुर्ची डळमळली तेव्हा मुंबई”करां”ची आठवण झाली’; आशिष शेलारांची टीका
- औरंगाबाद मनपा निवडणूक पुन्हा लांबणीवर; न्यायालयाच्या निर्णयाकडे राजकीय पक्षांचे लक्ष..!
- ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे यांची बिनविरोध निवड..!
- ‘आशिष शेलारांनी सुपारी उचलली आहे’; किशोरी पेडणेकरांची टीका
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<