जेएनयुच्या उमर खालिद वर हल्ला करणाऱ्या दलालच्या उमेदवारीवरून तमाशा

टीम महाराष्ट्र देशा : हरियाणा विधानसभा निवडणुकीत बहादूरगड मतदार संघातून नवीन दलालच्या उमेदवारीला विरोध केला जात आहे. दलालला शिवसेनेकडून उमेदवारी मिळाल्याने सर्वच बाजूने त्याचवर टीकेची झोड उठवली जात आहे. दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशन क्लबच्या बाहेर दलालने ऑगस्ट २०१८ मध्ये जेएनयूचा विद्यार्थी नेता उमर खालिदवर हल्ला केला होता. सहा महिन्यांपूर्वी शिवसेनेचे सदस्यत्व घेतले असून तो पक्षाच्या बहादूरगड युनिटचा जिल्हाध्यक्षही आहेत.

दलालने गौ रक्षक सेना नावाची गाय संरक्षण संस्था स्थापन केली आहे. ‘आम्ही गोरक्षण, राष्ट्रवाद आणि स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान यासारख्या मुद्द्यांवर लढत आहोत. भाजप आणि कॉंग्रेसचा गायी, राष्ट्रवाद, शेतकरी आणि गरीब यांच्याशी काही संबंध नाही. ते फक्त राजकारण करतात. ‘ असे त्याने एक वृत्तवाहिनीशी बोलताना म्हंटले आहे.

खालीद वरील हल्ल्याच्या गुन्हा हा त्याचा पहिला गुन्हा होता ए नाही तर यापूर्वीही त्याच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. पाच वर्षांपूर्वी बरच लोक गायीचे कापलेले डोके घेऊन भाजपच्या कार्यालयात पोहचले होते. त्यावेळी त्यांनी गौहत्या प्रकरणी कडक कायदा बनविण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली होती. या गर्दीत दलालहि सामील होता. तेव्हाही पोलिसांनी त्याला अटक केली होती. अजूनही हा खटला दिल्लीतील संसद पथ पोलिस स्टेशनमध्ये नोंदविण्यात आला असून सध्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. तर बहादूरगड पोलिस ठाण्यात भादंवि कलम १४७ आणि १४९ अन्वये दंगली पसरवल्याचा गुन्हा दाखल आहे. दलालने स्वत: च्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, त्याच्यावर तीन फौजदारी गुन्हे दाखल आहेत.

उमर खालिद १३ ऑगस्ट २०१८ रोजी दिल्ली कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये होणाऱ्या ‘कौफ से आझादी’ या कार्यक्रमाला पोहचले होता. कार्यक्रमापूर्वी जवळच एका चहाच्या दुकानाजवळ तो आपल्या मित्रांसोबत उभा होता. तेव्हा दलाल तिथे पोहचला आणी त्याच्यावर गोळीबार केला. यावेळी त्याच्यासोबत त्याचा साथीदार दरवेशही होता. मात्र या हल्ल्यात तो थोडक्यात बचावला. हल्ला झाल्यानंतर नवीन आणि दरवेश फरार झाले. नंतर या दोघांनी व्हिडिओ प्रसिद्ध केला आणि हल्ल्याला ‘देशासाठी स्वातंत्र्यदिनाची भेट’ असे वर्णन केले. यानंतर दोघांना अटक करण्यात आली. दलाल सध्या जामिनावर सुटला आहे.

महत्वाच्या बातम्या