शिवशाही बसच्या तिकीटात वृद्धांना मिळणार 45 टक्के सूट

मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसच्या तिकीटात वृद्धांना 45 टक्के सवलत देण्यात येणार आहे. एसटीच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी ही घोषणा केलीय. 1 जूनपासून वृद्धांना या सवलतीचा लाभ घेता येणार आहे.

सध्या एसटीच्या साध्या, रातराणी व निमआराम बसमधून ज्येष्ठ नागरिकांना प्रवास तिकिटात ५० टक्के सवलत मिळते. अशा प्रकारची सवलत नव्याने सुरु झालेल्या शिवशाही बसमध्ये सुद्धा मिळावी, अशी मागणी अनेक ज्येष्ठ नागरिकांनी रावते यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेत रावते यांनी याबाबत एसटी प्रशासनास प्रस्ताव तयार करण्यास सांगितले होते.

यानुसार सध्या सुरु असलेल्या वातानुकूलित शिवशाहीच्या आसन श्रेणीतील बसमध्ये एकूण तिकीट मूल्याच्या ४५ टक्के तर वातानुकूलित शिवशाहीच्या शयनयान श्रेणीतील बसमध्ये (एसी स्लीपर) एकूण तिकीट मूल्याच्या ३० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्र्यांनी दिली.