टीम महाराष्ट्र देशा: देशात सध्या दिवसेंदिवस इलेक्ट्रिक स्कूटर ट्रेंड वाढत चाललेला आहे. याच परिस्थितीचा फायदा घेत आघाडीची इलेक्ट्रिक टू व्हीलर उत्पादक कंपनी ओला Ola ने नुकतीच आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर Electric Scooter बाजारात लाँच केली आहे. देशात ओलाच्या आतापर्यंत 3 इलेक्ट्रिक स्कूटर लॉंच झालेल्या असून आत्ताची स्कूटर सगळ्यात जबरदस्त आहे. कंपनीने या स्कूटरचे नाव Ola S1 Air असे ठेवले आहे. ओलाच्या या नवीन इलेक्ट्रिक स्कूटरच्या लुक, रेंज, फीचर आणि किमती बद्दल जाणून घेऊया.
लुक
ओलाने नुकत्याच लॉंच केलेल्या या इलेक्ट्रिक स्कूटरचा लुक Ola S1 आणि Ola S1 Pro सारखाच आहे. या स्कूटरच्या लोअर बॉडी मध्ये ब्लॅक क्लेडिंग आणि स्टील व्हील्स यांसारखे बदल करण्यात आलेले आहे. सिंगल-पीस ट्यूबलर ग्रॅब रेल, स्माइली-आकाराचे ड्युअल-पॉड हेडलाइट, 7-इंच TFT टचस्क्रीन इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, इंडिकेटर-माउंट फ्रंट ऍप्रॉन, फ्लॅट प्रकारची सीट आणि एलईडी टेललॅम्प, रबराइज्ड फ्लॅट इत्यादी गोष्टींनी या स्कूटरच्या लुकला अधिक आकर्षित बनवले आहे.
फिचर्स
Ola S1 Air मध्ये तुम्हाला इको, रेग्युलर आणि स्पोर्ट असे तीन रायडिंग मोड उपलब्ध करून दिले आहे. या स्कूटरच्या मागील बाजूस ड्युअल शॉक एब्जॉर्बर आहे तर फ्रंट पुढच्या बाजूला टेलीस्कोपिक फोर्क्स देण्यात आले आहे.
रेंज
ओलाच्या नवीन इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये 4.5kW हब-माउंट इलेक्ट्रिक मोटर सोबत 2.5kW बॅटरी पॅक देण्यात आलेला आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरचा टॉप स्पीड 85कम प्रति तास असून ही स्कूटर एका चार्जर 101km पर्यंत धावू शकते. या स्कूटरला 0-40km प्रति तास वेग पकडण्यासाठी 4.3 सेकंद लागतात.
किंमत
ओलाच्या या नवीन Ola S1 Air ची एक्स शोरुम किंमत 79,999 रुपये एवढी आहे. तर ही किंमत दिवाळीनंतर 84,999 रुपये एवढी असेल. मिळालेल्या माहितीनुसार ही कंपनीची सर्वात स्वस्त स्कूटर आहे.
महत्वाच्या बातम्या
- IND vs Pak | पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी विराट कोहलीचे रोहित शर्माच्या कर्णधारपदावर मोठं वक्तव्य
- Abdul Sattar | मराठवाडा दौऱ्यावरून अब्दुल सत्तारांचा उद्धव ठाकरेंवर हल्ला, म्हणाले…
- Mohammed Shami : मोहम्मद शमी भारत-पाक सामन्यात गोलंदाजी करणार नाही; या माजी खेळाडूने सांगितले मोठे कारण
- Ajit Pawar | “…त्यापेक्षा त्यांनी सरळ रांगेत उभं राहावं”, अजित पवारांना ‘या’ आमदाराचा खोचक सल्ला
- Raju Shetti | “पन्नास हजार रुपये तुमच्या पन्नास खोक्यांपुढे…”; अब्दुल सत्तारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून राजू शेट्टी आक्रमक