लोकपाल विधेयक आणि लोकायुक्तांच्या नियुक्तीबाबत बैठकीवर काँग्रेसचा बहिष्कार

bjp congress logo

टीम महाराष्ट्र देशा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकपाल विधेयक आणि लोकायुक्तांच्या नियुक्तीबाबत लोकसभेच्या अध्यक्षा, चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि इतर नेत्यांसोबत एक बैठक बोलावली आहे. या बैठकीत काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनाही ‘विशेष आमंत्रित सदस्य’ म्हणून बोलावण्यात आले. मात्र या बैठकीला हजर राहणार नसल्याचे मल्लिकार्जुन खर्गे यांनी एक पत्र लिहून कळवले आहे. त्याचमुळे या बैठकीवर काँग्रेसने बहिष्कार घातल्याचे उघड आहे.

लोकपाल विधेयकाची अंमलबजावणी या सरकारने जाणीवपूर्वक लांबवली आहे असाही आरोप मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला आहे. लोकपाल समितीच्या बैठकीत मल्लिकार्जुन खर्गे यांनी सहभागी व्हायचे की नाही यासाठी पक्षाकडून कायदेशीर चाचपणी केली जाईल असे काँग्रेस सूत्रांनी म्हटले होते. मात्र मल्लिकार्जुन खर्गे यांनी या बैठकीत जाण्यास नकार दिला आहे.