ओखी वादळामुळे झालेल्या नुकसान भरपाई सरकारकडून जाहीर

नागपूर: या महिन्याच्या सुरूवातीला राज्याच्या किनारपट्टीवर ओखी चक्रीवादळ धडकलं होतं. त्यासाठी नुकसान भरपाई आज जाहीर झाली आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही भरपाई जाहीर केली आहे. पूर्णपणे नष्ट झालेल्या बोटींसाठी 9600 रुपये आणि मच्छीमारांच्या जाळ्यांचं नुकसानासाठी 2100 रुपयांची मदत जाहीर करण्यात आलीये. ओखीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे सुरू आहेत. जर ते नीट होत नसतील, तर पुन्हा पंचनामे करू. मी स्वतः त्या त्या ठिकाणी जायला तयार आहे, असं पाटील म्हणाले आहेत.

या वादळामुळे पर्यटनाचं आणि मच्छिमारांचं भरपूर नुकसान झालं होतं. याचाच अभ्यास करून आता राज्य सरकारनेही नुकसान भरपाई जाहीर केली आहे. ही भरपाई खालील प्रमाणे आहे.

जाहीर झालेली नुकसान भरपाई पुढीलप्रमाणे:

बोटीचं नुकसान – 4100 रु.

पूर्णपणे नष्ट झालेल्या बोटींसाठी – 9600 रु.

मच्छीमारांच्या जाळ्यांचं नुकसान – 2100 रु.

पूर्णपणे जाळं खराब झालं त्यांच्यासाठी – 2600 रु.

कोरडवाहू शेतीसाठी – 6000 रु. प्रति हेक्टर

बागायती शेतीसाठी : 13,500 रि. प्रति हेक्टरA