fbpx

विखे पिता-पुत्रांची गांधी भेट निष्फळ ? सुवेंद्र गांधींचे बंड काही केल्या शमेना

टीम महाराष्ट्र देशा : दोन दिवसांपुर्वी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी खासदार दिलीप गांधी यांची रात्री उशीरा भेट घेतली होती. तर काल डॉ.सुजय विखे यांनी खासदार दिलीप गांधी यांची भेट घेतली. त्यानंतरही दिलीप गांधी यांचे पुत्र सुवेंद्र गांधी यांनी बंड सुरूच ठेवत आज लोकसभेच्या रिंगणात उतरण्यासाठी अर्ज नेला आहे.

दरम्यान, काल भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे तर राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी अर्ज नेले. काल दुस-या दिवशी एकूण २३ जणांनी ३५ अर्ज नेले. दरम्यान, पहिल्या दिवशी एकूण २१ जणांनी ३९ अर्ज नेले होते. अद्यापपर्यत कोणीच अर्ज दाखल केला नाही.भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड व शिवसेनेचे माजी नगरसेवक दिलीप सातपुते यांनी प्रत्येकी दोन अर्ज नेले.

तर त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्यासाठी अशोक शेडाळे यांनी ३ अर्ज नेले. खासदार दिलीप गांधी यांचे पुत्र सुवेंद्र गांधी यांच्यासाठी अविनाश साखला यांनी उमेदवारी अर्ज नेला आहे.

2 Comments

Click here to post a comment