मसाप’च्या माधवराव पटवर्धन सभागृहात लागणार औंध संस्थांनच्या अधिपतींचे तैलचित्र

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात बाळासाहेब पंतप्रतिनिधींचे तैलचित्र लावण्यात येणार आहे. हे तैलचित्र लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर चिपळूण व मसाप शाखा चिपळूण यांच्यावतीने परिषदेला देण्यात आले आहे. ‘मसाप’चा महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्था असा नावलौकिक आहे. ही वास्तू उभारणीसाठी पंतप्रतिनिधींनी उदार मनाने जागा दिली होती.

देवरूखचे चित्रकार विक्रम परांजपे यांनी हे तैलचित्र साकारले आहे. या तैलचित्राचे अनावरण रविवार (ता. १५) सकाळी साडेदहा वाजता होणार आहे. पंतप्रतिनिधी यांच्या नातसून गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या हस्ते या तैलचित्राचे अनावरण करण्यात येणार आहे. तर ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माजी संमेलनाध्यक्ष डॉ.अरुणा ढेरे या कार्यक्रमाच्या प्रमुख अथिती असणार आहेत. अशी मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.

प्रा. जोशी म्हणाले, ‘राजा भवानराव तथा बाळासाहेब पंतप्रतिनिधी औंध संस्थांनचे अधिपती होते. त्यांनी टिळक रस्त्यावरील मसापची वास्तू उभारण्यासाठी उदार अंतकरणाने जागा दिल्याने परिषदेची हक्काची वास्तू उभी राहू शकली. त्यामुळे परिषदेच्या कार्याला स्थैर्य आले. पुढच्या पिढयांना हा इतिहास माहित व्हावा आणि पंतप्रतिनिधी यांच्या विषयीची कृतज्ञता व्यक्त करावी या भावनेने त्यांचे तैलचित्र परिषदेच्या सभागृहात लावण्याचा निर्णय परिषदेच्या कार्यकारी मंडळाने घेतला. या तैलचित्राखाली त्यांनी परिषदेला केलेल्या मदतीचा उल्लेख करण्यात येणार आहे.’

महत्त्वाच्या बातम्या :