मराठी चित्रपटसृष्टीत जॅान अब्राहमची एन्ट्री…

टीम महाराष्ट्र देशा : हिंदी चित्रपटसृष्टीतील काही कलाकार मराठी चित्रपटाच्या वाटेवर दिसता आहेत. काही दिवसांपूर्वी धक धक गर्ल माधुरी दिक्षितने मराठी सिनेमात एन्ट्री केली तिच्या पाठोपाठ आता जॅान अब्राहम देखील मराठी चित्रपटसृष्टीत येणार आहे. याआधी आशुतोष गोवारीकर, प्रियंका चोपडा, अजय देवगण यांनी मराठी चित्रपटसृष्टीत निर्माता म्हणून काम केलं आहे.त्यानंतर आता जॅान अब्राहमचंं नाव यात जोडलं जाईल. जॅान अब्राहमने ‘सविता दामोदर परांजपे’ या नाटकावर आधारित असलेल्या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी घेतली आहे. ‘सविता दामोदर परांजपे’ या नाटकाने ८० च्या दशकात रंगभूमी गाजविली होती.

जे. ए. एन्टरटेन्मेंट आणि पॅनोरमा स्टुडिओजची प्रस्तुती असलेल्या ‘सविता दामोदर परांजपे’ या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वप्ना वाघमारे जोशी करणार आहे. तर याआधी स्वप्ना वाघमारे जोशी हिने ‘मितवा’,‘फुगे’ आणि ‘तुला कळणार नाही’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

अभिनेता सुबोध भावे या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. त्यासोबतच तृप्ती तोरडमल आणि राकेश वसिष्ठ हे देखील चित्रपटात दिसणार आहे. ३१ ऑगस्ट हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे.

छोट्या पडद्यावरील अक्षयाची मोठ्या पडद्यावर एंट्री

प्रियदर्शन जाधव घेवून येत आहे रॉमकॉन शैलीचा ‘मस्का’

सुलभ वाहतूक व नियोजनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणार – मुख्यमंत्री