उज्ज्वल निकम यांच्या जीवनावर तयार होणार बायोपिक

मुंबई : विधीतज्ज्ञ आणि सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या जीवनावर बायोपिकची निर्मिती करण्यात येणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन ‘ओह माय गॉड’ चित्रपटाचे दिग्दर्शक उमेश शुक्ला हे करणार आहेत. या बायोपिकचे ‘निकम’ असे नाव असणार आहे.

याच पार्श्वभूमीवर उज्ज्वल निकम या बायोपिकबाबत बोलताना म्हणाले, की मला माझ्या आयुष्यावर पुस्तक किंवा चित्रपट तयार करण्यासाठी मागील बऱ्याच दिवसांपासून विचारणा करण्यात येत होती. मी याबद्दल आश्वासक नव्हतो. कारण, माझ्यावर फार मोठी जबाबदारी आहे. पण, अखेर मी प्रतिभाशाली टीमसोबत जुळून या बायोपिकसाठी तयार झालो. या टीमवर मला विश्वास आहे. ते या बायोपिकला योग्य तो न्याय देतील.

Loading...

तसेच ‘निकम’ या बायोपिकमध्ये उज्वल निकम यांच्या करिअरमधील महत्त्वाच्या घडामोडी पडद्यावर दाखवण्यात येणार आहेत. उमेश शुक्ला यांच्यासोबतच सेजल शाह, आशिष वाघ, गौरव शुक्ला आणि भावेश मंडलिया हे या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.

‘निकम’ नावाच्या या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. हा चित्रपट अशा एका व्यक्तीची कथा आहे, ज्याने मुंबईमधील 1993 मधला साखळी बॉम्बस्फोट, 26/11 दहशतवादी हल्ला, गुलशन कुमार हत्या प्रकरण आणि भाजपा नेते प्रमोद महाजन हत्या प्रकरणांसारखी हाय प्रोफाइल केसेससाठी त्यांनी लढल्या आहेत.

दरम्यान, उज्वल निकम यांच्यावरील आधारित ‘निकम’ या बायोपिकच्या शूटिंगला लवकरच सुरुवात होणार आहे. यामध्ये कोणते कलाकार भूमिका साकारणार आहेत हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
घ्या आता ! इंदुरीकर म्हणाले, मी असं बोललोच नाही
शरद पवार होणार निवृत्त ? पुन्हा राज्यसभेबाबत सस्पेन्स कायम
म्हणून नारायण राणे यांचा जळफळाट होतोय, शिवसेनेचा ढाण्या वाघ राणेंवर गरजला
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
चुकीला माफी नाही ! आदित्य ठाकरे यांनी केले दिल्लीतील 'त्या' अधिकाऱ्याला निलंबित
...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
एकनाथ खड्सेंचे निर्दोषत्व सिद्ध झाल्यास ; फडणवीस यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता ?
'तृप्ती देसाईंवर अश्लील टीका इंदुरीकरांच्या सूचनेनुसारच' ; तासगावात तक्रार