अरे देवा…. नागपूरकरांवर लटकतेय ‘इतक्या’ दिवसांच्या लॉकडाऊनची टांगती तलवार ?

nitin raut

नागपूर : शहरात कोरोनाचा वाढता संसर्ग थांबविण्यासाठी प्रशासन गंभीर निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. लॉकडाऊन संदर्भात निर्णय घेण्यासाठी आयुक्त, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त व पोलीस आयुक्त यांची समिती स्थापन करण्यात आली असल्याचे घोषणा आज पालक‘ंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली. विशेष म्हणजे पुढील लॉकडाऊनचा निर्णय घेण्यासाठी राज्यातील इतर शहरांत घेण्यात आलेल्या निर्णयांचा अभ्यास करून कालावधी निश्चित केला जाणार असल्याचे राऊत म्हणाले.

शहरात लॉकडाऊन लावण्याची वेळ आली तर, त्याचे अधिकार आयुक्तांना व जिल्हाधिकाèयांना आहेत. हा निर्णय कटू असला तरी तो घेणे आवश्यक आहे. या कालावधीचा कोणालाही त्रास होऊ नये म्हणून स्मार्ट प्लान तयार करण्यात येत असल्याचे राऊत म्हणाले. विशेष म्हणजे ज्या शहरात कमी कालावधीचा लॉकडाऊन लावण्यात आला तेथे अद्यापही स्थिती नियंत्रणात आली नसल्याने, शहरात लावण्यात येणारा लॉकडाऊन हा मोठ्या कालावधीचा असेल याचे स्पष्ट संकेत पालकमंत्र्यांनी दिले आहेत.

उपराजधानी नागपुरातील आव्हानात्मक स्थिती सुधरविण्यासाठी कडक निर्णय घेणे गरजेचे असले तरी, यात राजकीय हस्तक्षेप होऊ शकत नसल्याचे पालकमंत्री म्हणाले. हा निर्णय पूर्णत: आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारांत बसणारा असल्याने मी पालकमंत्री म्हणून लॉकडाऊनच्या निर्णयात हस्तक्षेप करू शकत नसल्याचे सांगताना, नागरिकांना शिस्त व सयंम पाळण्याचे आवाहन त्यांनी केले. स्मार्ट प्लान अंतर्गत कोणीही उपाशी राहणार नाही याची प्रशासनाकडून पुरेपूर काळजी घेतल्या जाईल. त्यासाठी प्रत्येकाने सहकार्य करणे अपेक्षित असल्याचे आवाहन राऊत यांनी केले.

ग्रामीण भागातील स्थिती बिकट असून, गरज पडल्यास नागपूर जिल्ह्यात १४ दिवसांच्या स्मार्ट पण कडक लॉकडाऊन लावण्याची वेळ येऊ शकते, असे डॉ. नितीन राऊत म्हणाले आहेत. त्यामुळे नागपूरकरांवर पुन्हा एकदा लॉकडाऊनची टांगती तलवार लटकते आहे हे आता स्पष्ट झाले आहे.

महत्वाच्या बातम्या-

चंद्रपूर जिल्ह्याला २०० युनिट विज मोफत द्या;आमदार किशोर जोरगेवार यांचे राज्यपाल यांना निवेदन

कुर्बानी ने कोरोना जाणार का ? दरेकरांचा शरद पवारांना सवाल