औरंगाबादमधील कचरा प्रश्न सोडवतांना अधिकाऱ्यांची उडाली तारांबळ

औरंगाबाद: औरंगाबादमधील कचरा प्रश्न सोडवतांना अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. सुका कचरा डोकेदुखी असून त्यासाठी पर्याय शोधत असल्याचे आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले. तसेच कचरा साठवण्यासाठी मनपाच्या पडीक इमारतींचा शोध घेण्यात येत आहे. मनपाकडे दोन महिन्याची वेळ असून या काळात म्हणजेच एक जूनपर्यंत कचरा निर्मूलनाची सर्व कामे मार्गी लावली नाहीत तर, कचराकोंडी मोठी आपत्ती बनू शकते.

शहरामधील कचराकोंडीच्या ३९व्या दिवशीही महानगरपालिकेकडून कचरा केवळ खाली-वर करण्याचे काम सुरू आहे. शहरात साचलेला कचरा प्रशासनासाठी मोठे संकट बनले आहे. मध्यवर्ती बसस्थानकाच्या बाजूला मोठ्या प्रमाणावर कचरा साचला आहे. त्यावर नाशिकच्या कंपनीकडून प्रक्रिया करण्यात येत असून. पूर्वी कचऱ्याचा पिरॅमिड करून त्यावर औषध फवारणी केली होती. आता तो कचरा खालीवर केला जात आहे. सध्या कचऱ्याचे वर्गीकरण सुरू असून सुक्यामधील विक्री होणारा कचरा वेचक घेऊन जात आहेत. मात्र, विक्री न होणारा १२ टन कचरा अंबुजा सिमेंट कंपनीला दिला जाणार असून याबाबत वाळूजमधील कंपनीशी चर्चा सुरू आहे. सुका कचरा डोकेदुखी असून त्यासाठी पर्याय शोधत असल्याचे आयुक्त राम यांनी सांगितले. तो साठवण्यासाठी मनपाच्या पडीक इमारतींचा शोध घेण्यात येत आहे. मनपाकडे दोन महिन्याची वेळ असून या काळात म्हणजेच एक जूनपर्यंत कचरा निर्मूलनाची सर्व कामे मार्गी लावली नाहीत तर, कचराकोंडी मोठी आपत्ती बनू शकते.

सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण आणि ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी शहरात विविध ठिकाणी मशीन लावण्यात येणार असून त्याची जागा निश्चिती करणे सुरू आहे. सध्या अडचण नाही, पण पावसाळ्यात त्रास होऊ नये म्हणून तेथे शेड टाकण्यात येणार आहे. हे काम १५ एप्रिलपर्यंत पूर्ण होईल तसेच शहरात प्लास्टिक बंदी घोषित केल्याबरोबर लगेच प्लास्टिक येणे बंद होणार नाही. त्यासाठी किमान एक महिन्याचा कालावधी लागणार असून प्लास्टिकला पर्याय शोधण्यासाठी मोठे विक्रेते आणि उत्पादकांची बैठक घेण्यात येणार आहे. त्यासाठी कागद, ज्यूट, कापडाचा पर्याय उपलब्ध करणार असून ज्यांच्याकडून सहकार्य मिळणार नाही, अशांवर दंडात्मक कारवाई होईल. कचरा फेकणाऱ्या व जाळणाऱ्यांवरही कारवाई करणार असल्याचे राम यांनी सांगितले.

You might also like
Comments
Loading...