प्रधानमंत्री निवासस्थानासाठी हटवली संरक्षण मंत्रालयातील तब्बल इतक्या अधिकाऱ्यांची कार्यालये

narendra modi

नवी-दिल्ली : सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट अंतर्गत नव्या संसदेचे आणि परिसरातील बांधकाम सध्या सुरु आहे. यामध्ये पंतप्रधान आणि उपराष्ट्रपती यांच्या निवासस्थानासोबतच अनेक नवीन कार्यालय भवन आणि मंत्रालयाच्या कार्यालयांसाठी केंद्रीय सचिवालय उभारले जात आहेत.

या पार्श्वभूमीवर दिल्लीमधील डलहौसी रोडवरील संरक्षण मंत्रालयाशी संबंधित असलेल्या अनेक अधिकाऱ्यांची कार्यालये पंतप्रधानांच्या निवासस्थानासाठी हटवली जात आहेत. यामध्ये ७०० हून अधिक कार्यालये हटविण्यात आली आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंत्रालयातील जवळपास सात हजार अधिकाऱ्यांना दिल्लीमधील कस्तुरबा गांधी मार्ग आणि चाणक्यपुरीजवळ अफ्रीका अव्हेन्यू येथील कार्यालयांमध्ये शिफ्ट केले जाणार आहे.

दरम्यान, कार्यालये हटविल्यानंतर साऊथ ब्लॉकजवळ ५० एकर जमीन उपलब्ध झाली आहे. याचा वापर सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्टमधील एक्झिक्युटिव्ह एन्क्लेव्हसाठी होणार असून या ठिकाणी पंतप्रधान निवासस्थानासोबत वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही कार्यालये असणार आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या हस्ते येथे उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या