गंगापुरात अधिकारी-कर्मचारी गैरहजर, कार्यालयाचा झाला पंचनामा

गंगापूर: महसूल प्रशासनाच्या वतीने सोमवारी करण्यात आलेल्या पंचनाम्यात शहरातील नांदूर-मधमेश्वर विभाग या दोन कार्यालयात दुपारपर्यंत एकही अधिकारी व कर्मचारी आढळून आला नसल्याची बाब समोर आली आहे त्यासंदर्भात मच्छिंद्र पठाडे यांनी तहसीलदारांकडे तक्रार केली होती. यावरुन एकुणच याठिकाणी अधिकारी कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार सुरु असल्याचे दिसून येत आहे.

नांदूर मधमेश्वर कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय शहरातील उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालयाच्या शेजारी आहे. सोमवारी दुपारी साडेबारा वाजता या कार्यालयात काही कामानिमित्ताने मच्छिंद्र पठाडे गेले असता त्यांना या कार्यालयाला कुलूप लावलेले आढळून आले. दरम्यान पठाडे यांनी याबाबत तहसीलदारांकडे तक्रार केल्यानंतर तहसीलदार यांच्या आदेशावरून पेशकार कराळे, तलाठी शिरसागर यांनी नांदूर-मध्यमेश्वर विभाग या दोन्ही कार्यालयांना भेट दिली.

नांदूर मधमेश्वर विभागाचे उपविभागीय अभियंता यांच्या कार्यालयात दुपारी साडेबारा वाजता चालक शेख मजीद शेख भिकन हा एकमेव कर्मचारी हजर असल्याचे दिसून आले. तर सहाय्यक अभियंता वर्ग एक व प्रभाग क्रमांक चारमध्ये एकही कर्मचारी आढळून आला नसल्याचे पेशकार कराळे, तलाठी शिरसागर यांनी केलेल्या पंचनाम्यात आठवण झाली. या पंचनाम्यात पंच म्हणून मच्छिंद्र पठाडे, दत्त यांच्या स्वाक्षर्‍या आहेत. एकंदरीतच या कार्यालयात अधिकारी व कर्मचारी यांचा मनमानी कारभार सुरू असल्याचे पंचनाम्यावरून दिसून येते. यापुढे या कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कशा प्रकारे कारवाई होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

महत्वाच्या बातम्या