सिंधुदुर्ग : महाराष्ट्रात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात देखील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. तर अनेकांचा संसार देखील आता उघड्यावर पडला असून सगळं वाहून गेल्याने खाणार काय? असा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. गेल्या २ दिवसांत अनेक नेत्यांनी दौऱ्यांचा धडाका लावला आहे. पालकमंत्र्यांसह विविध खात्यांचे मंत्री आणि आमदार-खासदार देखील पाहणी करत आहेत. मात्र, ठोस नुकसानभरपाई कधी ? यावर कोणीच बोललं नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
तेलंगणाने मदत जाहीर केली असून महाराष्ट्रात कधी? असा प्रश्न केला जात आहे. पंचनामे न करता सरसकट मदत जाहीर करावी अशी मागणी विरोधी पक्षांनी केली. मात्र, पंचनामे सुरु असून कोणालाही वाऱ्यावर सोडणार नसल्याचं वक्तव्य काल सोलापूर दौऱ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. सद्या कोणतीही ठोस घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली नसतानाच पंचनामे करण्यास अधिकारी चालढकल करत असल्याचं समोर आलं आहे.
अवकाळी पावसामुळे कोकणात भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्याची पहाणी करण्यासाठी भाजप आमदार नितेश राणे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पोहोचले पण एकही प्रशासनाचा कर्मचारी तिथे हजर नव्हता. त्यामुळे पंचनामे करण्यासाठी अधिकारी टाळाटाळ करत आहेत हे पुन्हा एकदा समोर आलं आहे.
यानंतर नितेश राणे यांनी आपल्या स्टाईलमध्ये देवगड तालुक्यातील लिगडाळ गावामध्ये शेताच्या बांधावर जाऊन अधिकाऱ्यांना खडसावले. एक तासाचा वेळ देतो, जिथे असाल तिथून लगेच निघा आणि ताबडतोब पंचनामे करायला शेताच्या बांधावर या, एक तासाचा वेळ देतो अशी तंबीच आमदार नितेश राणे यांनी या अधिकाऱ्यांना दिली.
महत्वाच्या बातम्या-
- ‘कोरोना विषाणूच्या साथीपासून बचावासाठी अजून दोन महिने सतर्क रहा’
- ‘अजितदादांनीच आता शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी 50 हजार कोटी रुपयांची मदत करावी’
- लोकप्रतिनिधीच महिलांना ‘आइटम’ म्हणत असतील तर इतरांनी काय आदर्श घ्यावा ?
- भाजप नगरसेवकांची मुंबईत महापौरांच्या विरोधात निदर्शने
- नगरमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये आरोप-प्रत्यारोप ; वाद वरिष्ठांकडे जाणार ?