गट शिक्षणाधिकाऱ्यास लाच घेताना अटक

धुळे:-  शिक्षकांच्या हजेरी पुस्तकात नोंद करुण दाखला देण्यासाठी नऊ हजारांची लाच घेतांना धुळे तालुका पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी श्रीमती सुरेखा देवरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्या देवपूरातील राहत्या घरातून ताब्यात घेत अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी रात्री करण्यात आली आहे.

पंचायत समितीतर्गंत येणा-या जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांच्या हजेरी पुस्तकात हजेरीची नोंद करुण त्यावर स्वाक्षरी करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी सुरेखा देवरे यांनी 27 शिक्षकांकडून प्रत्येकी 3 हजार रुपयांप्रमाणे एकूण 81 हजार रुपये लाचेची मागणी केली याबाबत एका शिक्षिकेच्या पतीने देवरे यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

त्यावरुण सापळा रचून गटशिक्षणाशिकारी सुरेखा देवरे यांना त्यांच्या देवपूरातील भरत नगरात राहत असलेल्या घरातून पैसे घेतांना रंगेहात पकडून ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.