ऑफिसकरता कसा निवडाल स्टाईलिश लुक .

फस्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन अस नेहमी बोल जात आपण कोठेही जाऊ द्या. आपण घातलेल्या पोशाखावरून आपली एक प्रतिमा तयार होते. त्यामुळे पोशाखाला खूप महत्व आहे.जर तुम्हाला एकादी नवीन नोकरी लागली असेल आणि ऑफिसमध्ये तुमचा पहिला दिवस असेल तर चांगले कपडे घालून जाणे गरजेचे आहे.

आपण पाहिले असेलच की, एखादा सेलिब्रिटी जेव्हा आॅफिस वर्क करणाऱ्या व्यक्तीची भूमिका करतो तेव्हा त्याला लूक अगदी तसाच असतो आणि तोच अॅकक्टर फॅशनेबल रोलमध्ये असेल तर त्याचा लूकदेखील बदलतो. ही सर्व किमया आहे, कपड्यांची. तो भूमिकेनुसार कपडे परिधान करतो म्हणून त्याचा लूक वेगवेगळा दिसतोआपणही आॅफिस वर्क करीत असाल तर आपले कपडेही आॅफिसला मॅच होतील असेच असावेत. बऱ्याचदा आपणास आॅफिस कपड्यांची जाण नसते. अनेकदा आपल्या कपड्यांमुळे आपण विनोदास पात्र ठरतो. अशी फजिती होऊ नये म्हणून आम्ही आपणास काही टिप्स देत आहोत, ज्या वापरून तुम्ही सगळ्यात हटके व स्टायलिश दिसू शकता.

* कपडे खरेदी करताना काय काळजी घ्याल?
* आॅफिसमध्ये घालायला निळा, ब्राऊन, पांढरा किंवा काळा रंग वापरा. या रंगांमुळे तुम्ही अधिकच सुंदर दिसाल.

* आॅफिससाठी नेहमी लेटेस्ट फॅशनचे कपडे वापरा. लेटेस्ट डिझाईनचे घालताना फार भडक कपडे घालू नका.

* आपले वजन जास्त असल्यास जॉमेट्रिकल प्रिंट जसे रेघा, वर्तुळ, चौकोन, त्रिकोण अशा विविध भूमितीय प्रिंटचे कपडे परिधान करु शकता. याने आपण स्लीम दिसाल आणि आकर्षकही वाटणार.

* आॅफिससाठी कपडे निवडताना आपल्या आॅफिसच्या वातावरणाचेच नव्हे तर आॅफिसच्या बाहेरील परिसराचेही भान ठेवायला हवे. वातानुरुप कपडे आकर्षक वाटतात.

* बहुतेकजण स्टायलिश दिसण्यासाठी नको ते कपडे वापरतात आणि आॅफिसात विनोदास पात्र ठरतात. त्यापेक्षा आपणास कम्फर्टेबल वाटतील असेच फॉर्मल कपडे घाला. स्टायलिस बनायच्या नादात असे कपडे घालू नका ज्यामुळे ऑफिसमध्ये तुम्ही विनोदास पात्र ठराल.