आंदोलकांवर गुन्हे लावा- शिवसेना

शिवसेना

अमरावती – महाराष्ट्र बंद दरम्यान अमरावती येथे व्यापारी प्रतिष्ठानांवर झालेल्या दगडफेकीची चौकशी करून आंदोलकांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीचं निवेदन अमरावती शिवसेना शहर शाखेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

निवेदनात नमूद केल्यानुसार महाराष्ट्र बंदच्यादरम्यान आंदोलकांनी शहरातील बंद असलेल्या दुकानांवर दगडफेक करीत तसेच शिवीगाळ करीत शहरात धुडगूस घातला तसेच अनेक दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसानही केले आहे.

झालेल्या नुकसानाच्या निषेधार्थ आंदोलकांवर कठोर कारवाई करून व्यापाऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची भरपाई आंदोलकांकडून करण्यात यावी अशी मागणी यावेळी जिल्हा प्रशासनाकडे शिवसेना जिल्हा प्रमुख संजय बंड यांनी केली आहे. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.