पक्षविरोधी भूमिकेचे आ. सावंत यांच्याकडून खंडण

तानाजी सावंत

उस्मानाबाद : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शिवसेनेचे आमदार तानाजी सांवत यांनी शिवसेनेच्या खासदार आणि आमदारांना दटावण्याचा प्रयत्न केला. तर भाजपच्या आमदारांची बाजू घेताना दिसले. या घटनांमुळे आ. सावंत यांच्या पक्षातंराच्या चर्चांना वेग आला होता. पण आमदार सावंतांनी प्रसिध्दीपत्रक काढून या वृत्ताचे खंडण केले आहे.

आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला असल्याचे आमदार सावंत म्हणाले आहे. नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार सावंत यांनी स्वपक्षीय आमदार आणि खासदारांना दटावण्याचा प्रयत्न केला तसेच नगराध्यक्षावर भडकले. सिंचन प्रकल्पाच्या वाढीव कामाबद्दलचा ठरावाचा खासदार आणि आमदार याच्यांशी काही संबध नाही. या कामासाठी आपण स्वत: पाठपूरावा केला आसल्याचे ते म्हणाले होते. तर उस्मानाबादच्या नगराध्यक्षकावर परंडा पालिकेच्या विषयावरुन भडकले. या दरम्यान भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी समजावून सांगितल्यानंतर ते शांत झाले.

आमदार सावंत यांच्या अशा भुमीकेमुळे सगळीकडे आ. सावंत यांच्या पक्षातंराच्या चर्चा सुरु झाल्या . पण आपण कधीही पक्षविरोधी भूमिका घेतली नसल्याचे स्पष्टीकरन देत आमदार सावंत यांनी पक्षातंराच्या वृत्ताचे खंडण केले. सर्वसामान्याचे प्रश्न सोडावण्यासाठी लोकप्रतिनीधींनी प्रशासनास सुनावणे गरजेचे आहे असे आमदार सावंत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या