मुंबईतल्या मुलुंडमध्ये धडाडणार ठाकरी तोफ !

टीम महाराष्ट्र देशा : गेल्या काही महिन्यांत आपल्या कुंचल्यातून सरकारला धारेवर धरणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे राजकीय वजन दिवसेंदिवस वाढत आहे ते आपल्या जाहीर सभांमधून सुद्धा सरकारवर जोरदार फटकेबाजी करत आहेत. त्याचा पुढचा भाग आज मुंबई मधील मुलुंड येथे पाहायला मिळणार आहे.

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची आज मुंबईतल्या मुलुंडमध्ये जाहीर सभा होणार आहे. संध्याकाळी 6 वाजता ही सभा होणार आहे. नाणार प्रकल्प, शेतकऱ्यांचे प्रश्न, महिला सुरक्षा आदींमुळे राज ठाकरे काय बोलणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.

मनसेच्या वतीने मुंबईतल्या महिलांना शंभर रिक्षाचं वाटप कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यानिमित्तानं राज ठाकरेंची ही सभा होणार आहे. भाजी मार्केट परिसरात संध्याकाळी 6 वाजता या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे.

Shivjal