कर्नाटक निवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस

नवी दिल्ली –  भाजप आणि काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज सगळ्याच पक्षांकडून आज जास्तीत जास्त प्रचार करण्याचा प्रयत्न केला जाईल. भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार येडियुरप्पा आज मुख्यमंत्री सिद्धरामैय्यांच्या बदामी या मतदारसंघात रोड शो घेणार आहेत. तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सिद्धरामय्याही आज प्रचार करणार आहे.

दोन्ही पक्षांसाठी ही निवडणूक महत्वाची आहे कारण २०१९ च्या निवडणुकांची रंगीत तालीम म्हणून याकडे पाहिलं जातंय. दरम्यान आज प्रचारांच्या मैदानात राहुल गांधी पत्रकार परिषद घेणार आहे. त्यामुळे यात ते कोणत्या मुद्द्यांवर भाष्य करणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.कर्नाटकमध्ये शनिवारी १२ मे रोजी मतदान आणि मंगळवारी १५ मे रोजी मतमोजणी होणार आहे.

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

पण दरम्यान काल, बेळगावमध्ये काँग्रेस उमेदवाराच्या रॅलीत पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्याने एकच खळबळ उडालीय. फिरोज शेठ हे काँग्रेसकडून बेळगाव उत्तर मधून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या गांधीनगर इथे झालेल्या रॅलीत हा प्रकार घडलाय.

Shivjal