मोठी बातमी : वाचा पाचव्या लॉकडाऊनमध्ये काय होणार सुरु…

Modi lockdown new

नवी दिल्ली : कोरोनामुळे देशातील परिस्थिती बिकट बनत चालल्याने केंद्र सरकारने लॉकडाऊनच्या ५ व्या टप्प्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारकडून नवे नियम जारी करण्यात आल्या आहेत. या लॉकडाऊनमध्ये अनेक नियम शिथील करण्यात आले आहे. प्रतिबंधित भाग सोडून इतर भागात प्रार्थना स्थळ, हाँटेल, रेस्टारंट सुरु होणार आहे. या विविध नियमाचं पालन करून पुढील गोष्टी सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. येत्या 8 जूनपासून या सर्व गोष्टी सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा 24 मार्चला रात्री लॉकडाऊन घोषित केला होता. तो लॉकडाऊन 14 एप्रिलपर्यंत होता. मग त्यामध्ये वाढ करुन तो तीन मे पर्यंत वाढवण्यात आला. त्यानंतरही भारतातील कोरोना वाढतच गेल्याने हा लॉकडाऊन 17 मेपर्यंत आणि त्यानंतर 31 मेपर्यंत वाढवण्यात आला.

Breaking : देशात ३० जूनपर्यंत लॉकडाऊन वाढला

रात्री ९ वाजेपासून ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे. आतापर्यंत रात्री ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली होती. ही संचारबंदी कमी करण्यात आली आहे. शाळा, कॉलेज आणि शिक्षणसंस्था सुरू करण्याबाबत सरकार नंतर दिशानिर्देश जारी करणार आहे.

एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यावरील बंदी हटवण्यात आली आहे. राज्यातही एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाता येणार आहे. तसंच कुठही येण्या-जाण्यासाठी आता कुठलीही परवानगीची घ्यावी लागणार नाही.

मंदिर, मशिद, गुरुद्वारा आणि चर्च सुरू करण्यात येतील. अनेक राज्यांनी मॉल सुरू करण्याची मागणी केली होती. मॉलही टप्प्याटप्प्याने सुरू केले जातील. शाळा, कॉलेज दुसऱ्या टप्प्यात उघडण्याची शक्यता आहे. तर ८ जूनपासून हॉटेल्स, रेस्टॉरंटही सुरू करण्यात येतील. पण सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क बंधनकारक असेल. धार्मिक स्थळांसह सलूनही सुरू होतील. पण त्यासाठी अटी लागू केली जातील. त्यांचे पालन करावे लागेल. पण राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी कायम ठेवण्यात आली आहे.

दिलासादायक : मुंबईत रुग्णवाढ दुप्पट होण्याचा सरासरी कालावधी १३ वरुन आता १६ दिवसांवर

IMP