सर्व जाती धर्मातील उपेक्षितांना आरक्षण मिळावे ,गोलमेज परिषदेतील सूर

golmej parishad

पुणे – सर्वच जाती आणि धर्मातील काही लोक हे अत्यंत गरिबीत आणि उपेक्षित आहेत .त्या सर्वांना सामाजिक आणि आर्थिक निकषावर आरक्षण मिळाले पाहिजे त्याच बरोबर S.C ,S.T ,व इतर घटनात्मक आरक्षणाला धक्का न लावता इतर घटकांना आरक्षण मिळावे अशी मराठा, धनगर, मुस्लिम, लिंगायत, जैन, ख्रिश्चन या आरक्षण मागणी करणाऱ्या समुदायातील प्रतिनिधींनी भावना व्यक्त केल्या .

पी.ए. इनामदार म्हणाले की, 52 %वरून आरक्षणाची मर्यादा 70% करण्यात यावी तसेच नुसते आंदोलन करून प्रश्न सुटणार नाही तर संविंधनाच्या चौकटीत बसेल अशा पद्धतीने विचार सर्वांनी मिळून केला पाहिजे.

श्रीमंत कोकाटे यांनी मराठा समाजाचा कुणाच्या आरक्षणाला विरोध नाही परंतु मराठा समाजाला आरक्षण मिळावे तसेच मराठा समाज मागासवर्गीय असल्याचे ऐतिहासिक आणि सामाजिक संदर्भ सांगितले.

प्रा .अर्जुन सलगर यांनी धनगर समाज हा आदिवासी सदृश्य असल्याचे तसेच या समाजाला आरक्षणाची नितांत गरज असल्याचे मत व्यक्त केले. प्रा .प्रदीप फलटने यांनी जैन समाजच्या व्यथा सांगितल्या.

ब्राम्हण महासंघाचे आनंद दवे यांनी ब्राम्हण समाजा ला आरक्षण नको परंतु ब्राम्हणांमध्ये काही लोक अंत्यत उपेक्षित आहेत त्यांचा विचार झाला पाहिजे शिवाय आर्थिक निकषावर आरक्षण मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली. राजेंद्र आहुवलीया यांनी शीख समाजालाही आर्थिक निकषावर आरक्षण मिळावे अशी मागणी केली .डॉ. मॅन्युअल डिसोझा यांनी ख्रिश्चन समाजाची भूमिका सांगितली. यावेळी पुरुषोत्तम खेडेकर, अजीज पठाण, प्रा.सुषमा अंधारे, रेखाताई आखाडे, हाजी पठाण, राजेंद्र कोंढरे, गंगाधर बनभरे, राहुल पोकळे, मिलिंद अहिरे, श्याम गायकवाड आदींनी विचार व्यक्त केले.

आज आजम कॅम्पस येथे मराठा मुस्लिम जैन धनगर ब्राह्माण लिगायत समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मुस्लिम मूक महामोर्चा समन्वयक समिती तर्फे गोलमेज परिषद चे आयोजन करण्यात आले होते.प्रतिनिधी या गोलमेज परिषद मध्ये उपस्थित होते. या गोलमेज परिषद मध्ये आरक्षण मिळण्यासाठी कोणते उपाययोजना कराव्यात या विषयावर चर्चा करण्यात आली . येत्या ९सप्टेंबर ला मुस्लिम मूक महामोर्चा समन्वयक समिती तर्फे मूक महामोर्चा चे आयोजन करण्यात आले आहे.

प्रत्येक समाजाला योग्यते आरक्षण मिळाले पाहिजे. एक वेगळ्या क्षमतेच्या बाहेर जाऊन आपण सर्वानी विचार करण्यासाठी हि सर्वधर्मीय गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले होते असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले
सुत्रांसंचालन रमेश राक्षे यांनी केले तर आभार अनिल हतागले यांनी मानले.