Breaking News : संजय राऊतांच्या शस्त्रक्रियेचा डॉक्टरांनी घेतला निर्णय

blank

टीम महाराष्ट्र देशा : शिवसेना खासदार संजय राऊत यांना छातीत दुखण्याच्या कारणास्तव लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी केलेल्या तपासणीनंतर संजय राऊत यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉल्केज आढळून आले आहेत. त्यामुळे संजय राऊत यांच्यावर एन्जिओ प्लास्टी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेची बाजू उचलून धरताना दिसत होते. अशा परीस्थितीत कामाचा वाढता तणाव, पत्रकार परिषद, सामनातील अग्रलेख, यामुळे दैनंदिन जीवनात अडथळे येत होते. छातीत दुखत असल्यामुळे त्यांनी डॉक्टरांची पूर्व नियोजित वेळ घेतली होती. त्या वेळेनुसार ते आज रुग्णालयात दाखल झाले आहेत.

साधारण दोन दिवस त्यांना रुग्णालयात डॉ. जलील परकर यांच्या देखरेखीखाली यांच्यावर उपचार करण्यात येणार आहेत. या दोन दिवसात त्यांना कोणालाही भेटता येणार नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच घाबरण्याचे कारण नसल्याचा हवाला डॉक्टरांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या