पद्मेश पाटील यांच्या उपचारात अडथळे

yogesh dodke

वेब टीम:- पुण्यातील गिर्यारोहक पद्मेश पाटील याचा स्वातंत्र्यदिनादिवशी लेह लडाख येथील कांगरी टेकडी उतरत असताना पाय घसरून अपघात झाला. त्यानंतर त्याला योग्य उपचार मिळत नव्हते. मात्र त्याला आता चंडीगड येथील वायुदलाच्या रुग्णालयात आणण्यात आले असून, तेथेही उपचारांमध्ये वेग नसल्याचे जखमी पद्मेश याचा भाऊ पंकज आणि नगरसेवक सचिन दोडके यांनी सांगितले आहे. त्याला अद्याप व्हेंटीलेटर देखील लावण्यात आलेला नसून, हाताने दाबण्याच्या फुग्याने त्याला ऑक्सिजन पुरवला जात असल्याचे भयाण वास्तव समोर आलं आहे.

जखमी पद्मेश पाटील याला एअर अॅम्ब्युलंस उपलब्ध होत नसल्याने पुढील उपचारार्थ हलवण्यात अडथळा येत होता. शासकीय स्तरावरून त्यासाठी हालचाली होत असल्याचे मंत्रालयातून कळवण्यात आले होते. तसे पत्र देखील पाटील कुटुंबियांना पुण्यात देण्यात आले. मात्र वास्तविक पाहता तसे काहीच घडत नसल्याचे समोर आलं आहे . लेह मध्ये जावून तातडीने जखमी पद्मेश याला चंडीगड येथे रुग्णवाहिकेतून हलवले आहे. तेथे हव्या तेवढ्या वेगवान प्रमाणात जखमीवर उपचार सुरु करण्यात येत नसल्याचे समोर आले आहे.याबाबत दोडके यांनी तेथील सर्व संबंधिताना भेटून जखमी पद्मेशवर उपचारांची गती वाढवण्याची विनंती केली आहे. मात्र त्याला रुग्णालय प्रशासन दाद देत नसल्याच नगरसवेक सचिन दोडके यांच्यासह जखमी पद्मेशचा भाऊ पंकज यांनी सांगितले आहे

काय आहे प्रकरण ?

पद्मेश पांडुरंग पाटील हा गिर्यारोहक मंगळवार रोजी लेह लडाखला गेला होता .बुधवार (दि.९) दिल्ली वरून लडाख करता त्यांच्या जथ्थ्याने मार्गक्रमण केले होते. गुरुवार (दि.१०) तारखेला त्यांनी गिर्यारोहणाच्या त्यांच्या कार्यक्रमाला सुरवात केली. दरम्यान मंगळवार (दि.१५) स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी सकाळी सात साडेसात वाजता पुढच्या टप्प्यासाठी निघाले असता पद्मेश पाटील कांगरी टेकडी भागात रोप क्लायंबिंग करत असताना,अचानक खाली कोसळला .