Share

Eknath Shinde | एकनाथ शिंदे गटाच्या चिन्हावर देखील आक्षेप ; काय आहे प्रकरण?

Eknath Shinde | नांदेड : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह आयोगाकडून गोठवण्यात आले असून दोन्ही गटाला पक्षाच नवं नाव आणि चिन्हं तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आलं आहे. यामध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) याच्या शिवसेनेला ‘मशाल’ हे चिन्ह देण्यात आलं आहे. मात्र, ठाकरे गटाला देण्यात आलेल्या मशाल या चिन्हावर समता पार्टीने (Samata Party) दावा ठोकला असून ते आता यासाठी हायकोर्टात जाणार आहेत. हे प्रकरण मिटत नाही तोवरच आता एकनाथ शिंदे गटाच्या चिन्हावर आक्षेप घेण्यात आला आहे.

एकनाथ शिंदेंच्या गटाला मिळालेल्या ढाल-तलवार या चिन्हावरून शिख बांधवांनी आक्षेप घेतला आहे. निवडणूक आयोगाने त्रिशुळ ह चिन्ह जसं धार्मिक आहे म्हणून वगळलं तसं ढाल-तलवार हे चिन्ह शिख धर्मियांशी संबंधित आहे, असा आक्षेप त्यांनी घेतलाय. नांदेड येथील गुरुद्वारा बोर्डाचे रणजितसिंग कामठेकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना याबाबत भाष्य केले आहे.

गुरुगोविंदसिंगजी महाराजांनी खालसा पंथाच्या स्थापनेवेळी ढाल आणि तलवार पंथाला दिली आहे. आमच्या पाचही तख्तावर ढाल तलवारीची पूजा दररोज होते. त्यामुळे ज्या प्रमाणे त्रिशुळाला चिन्हांच्या यादीतून बाद करण्यात आलं. त्याचप्रमाणे ढाल तलवार निशाणीलाही बाजूला कराव. अशी मागणी त्यांनी केली आहे.

एकनाथ शिंदे गटाला मिळालेल्या ढाल-तलवार चिन्हावर आक्षेप

मी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ), गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नेते अशोक चव्हाण, शरद पवार ( Sharad Pawar ) , तसेच इतरही मोठ्या नेत्यांना मी ट्विट केलंय. खालसा पंथाची निशाणी कोणत्याही पक्षाला देऊ नये, अशी विनंती मी ममता बॅनर्जी आदी नेत्यांनाही केली आहे. निवडणूक आयोगाने ही विनंती मान्य नाही केली तर संविधानाप्रमाणे आम्ही पुढची लढाई लढू, असा इशारा शीख बांधवांनी दिलाय.

दरम्यान, समता पक्षाने ठाकरेंना देण्यात आलेल्या मशाल चिन्हावर आक्षेप घेतला आहे. समता पक्ष दिल्ली उच्च न्यायालयामध्ये आपली बाजू मांडणार आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मशाल हे चिन्ह देण्यात आलं आहे, पण त्यांना हे चिन्ह देऊ नये. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मशाल चिन्ह दिल्यामुळे समता पक्षाच्या पाठिंब्याला फटका बसला आहे, असा दावा समता पक्षाकडून करण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या :

Eknath Shinde | नांदेड : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह आयोगाकडून गोठवण्यात आले असून दोन्ही गटाला …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now