महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणाने ओबीसींचे आरक्षण गेले-हंसराज अहिर

नाशिक : मराठा आरक्षणापाठाेपाठ ओबीसी आरक्षण देखील केवळ महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळेच गेले आहे. ओबीसी समाजासाठी काँग्रेसने यापूर्वी देखील काहीही केलेले नाही. केवळ आगामी निवडणुका समाेर ठेवत ओबीसींबाबत त्याचे प्रेम उफाळून येत असल्याची टीका माजी केंद्रीयमंत्री हंसराज अहिर यांनी भाजपच्या वतीने आयाेजित ओबीसी विभागीय मेळाव्यात केली.

भाजपच्या वतीने राज्यभरात ओबीसी जागर अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत विभागीय मेळाव्याचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी अहिर बाेलत हाेत. व्यासपीठावर माजी मंत्री गिरीश महाजन, जयप्रकाश रावल, राम शिंदे, आमदार राहुल ढिकले, देवयानी फरांदे, सीमा हिरे, भाजप ओबीसी महामोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर उपस्थित हाेते.

यावेळी अहिर यांनी सांगितले की पंतप्रधान माेदी स्वत: ओबीसी असल्याने ते ओबीसी आरक्षणाकडे लक्ष देत आहे. ओबीसी मंडल आयोगाच्या स्थापनेसाठी भाजपनेच आग्रह धरला. ओबीसी समाजाचे सर्व प्रश्न साेडण्यासाठी भाजपने नेहमी पुढाकार घेतला आहे.

महाविकास आघाडीचे नेते ओबीसी आरक्षणाविराेधात आहे. पंतप्रधान माेदी ओबीसीच असल्याने त्यांना अडचणीत आणण्यासाठी महाविकास आघाडीतील नेते नेहमी टीका करत असल्याचे माजीमंत्री रावल यांनी सांगितले. ओबीसीना आरक्षण मिळाले नाही तर पुढच्या पिढींचे नुकसान हाेईल. ओबीसी आरक्षणाची मशाल या माध्यमातून पेटवली आहे. आगामी काळात आरक्षण प्राप्त झाले नाही तर यात महाविकास आघाडी भस्मसात हाेईल, असा इशारा रावल यांनी दिला.

महत्त्वाच्या बातम्या