‘ओबीसींना दिवसाढवळ्या डावललं जातंय’,पडळकरांचा आरोप

padalkar

मुंबई: गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर निशाना साधला आहे. ओबीसींना जोपर्यंत योग्य प्रतिनिधीत्व मिळत नाही,तोपर्यंत सरळसेवा भरतीवर स्थगिती होती, मात्र आता ती स्थगिती उठवण्यात आली आहे. तर यासाठी बिंदूनामावलीतही बदल करण्यात आला आहे. यावरूनच पडळकर यांनी ओबीसींना आरक्षणातून डावललं जातंय असा आरोप ठाकरे सरकारवर केला आहे.

गोपीचंद पडळकर यांनी याबाबत ट्वीट करत निशाना साधला आहे. ‘सरळसेवा भरतीवरील स्थगिती उठवत बिंदू नामावलीतही दिवसाढवळ्या ओबीसींना डावललं जातंय. ओबीसींच्या संवैधानिक अधिकारांना पायदळी तुडवणाऱ्या ‘प्रस्थापितांच्या’ सरकारचा धिक्कार असो.’ असे ट्वीट त्यांनी केले आहे.

दरम्यान आदिवासी बहुल जिल्ह्यातील सरळसेवेने भरती करण्यासाठी बिंदू नामावली करण्यात आली होती. मात्र सर्वाच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याने पुढील निर्णयापर्यंत यावर स्थगिती देण्यात आली होती. मात्र आता ही स्थगिती उठविण्यात आली आहे. तसेच यासाठी भरतीप्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. याचाच विरोध करत पडळकर यांनी ठाकरे सरकारवर निशाना साधला आहे.

महत्त्वाच्या बातम्या