‘ओबीसी आरक्षण प्रश्नी आज मुख्यमंत्र्यांची सर्वपक्षीय नेत्यांसोबत बैठक’

uddhav thakre

मुंबई: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी राजकीय आरक्षणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी तीन वाजता सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणसंबंधी मोठा निर्णय होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

दरम्यान कालच भाजपचे सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य सरकारने तीन महिन्यांमध्ये इंपिरिकल डेटा जमा करून ओबीसींना आरक्षण द्यावे अन्यथा मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही असा इशारा दिला होता. तर आज १३ सप्टेंबररोजी मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलावली आहे.

दरम्यान फेब्रुवारी-मार्चमध्ये मुंबईसह १० महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्याचबरोबर २५ जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुका आहेत.राज्य सरकारने जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुढे ढकलल्या. पण हा अधिकार राज्य सरकारला नसून आयोगाचा आहे, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणाचा प्रश्न जोपर्यंत आहे तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्य सरकारला पुढे ढकलता येणार नाहीत. असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.

दरम्यान ओबीसींच्या आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणुका घेऊ नयेत, अशी सर्व पक्षांनी मागणी केली होती. त्यावर सविस्तर अभ्यास करून, कायदेशीर अभिप्राय मागवून, पुढील बैठकीत त्यावर चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले होते. त्यानुसार आज पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत आरक्षणसंबंधी मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या :