ओबीसी समाजासाठी ७०० कोटी

मुंबई : लोकसभेच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार नंतर आता  राज्य सरकारनेही अनेक नव्या योजनांच्या घोषणांचा पाऊस पाडला आहे. त्यामध्ये आजच्या कॅबिनेट मिटिंगमध्ये ओबीसी समाजासाठी ७०० कोटींच्या योजनांचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.

मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर आता  दलित समाजासाठी अनेक घोषणा राज्य सरकार केल्यानंतर ओबीसी समाजातून नाराजीचा सूर वाढला होता. त्याच पार्श्वभूमीवर  ओबीसी समाजाला खुश करण्यासाठी ७०० कोटींच्या योजनेच्या आज घोषणा करण्यात आल्या आहेत.

ओबीसी महामंडळाला २५० कोटी, भटक्या – विमुक्त महामंडळाला ३०० कोटी, तर पहिल्यांदाच वडार आणि रामोशी समाजासाठी विशेष पॅकेज देण्यात आलं आहे. आज कॅबिनेटमध्ये या विविध योजनांना मान्यता देण्यात आली आहे.