ओवेसी तर मुर्ख! श्री श्री रवीशंकर यांची जोरदार टीका

नवी दिल्ली: श्री श्री रवीशंकर यांच्या सीरियाबाबतच्या विधानावर एफआयर दाखल करणार असल्याचं ओवेसी यांनी म्हटले होते. त्यावर रवीशंकर यांना प्रतिक्रिया विचारली असता ‘अशा मुर्खांच्या वक्तव्यावर मला कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही’ असे वक्तव्य श्री श्री यांनी केले आहे.

आयोध्येमध्ये राम मंदिर झाले नाही तर देशात सीरियासारखी अवस्था निर्माण होऊ शकते अशी शक्यता श्री श्री यांनी सोमवारी व्यक्त केली होती. यावर एफआयर दाखल करणार असल्याचं ओवेसी यांनी म्हटले होते. श्री श्री हे आता स्वत:ला इतके मोठे समजत आहेत की सर्व जण त्यांचं म्हणणं ऐकतील अशी टीका ओवेसींनी केली होती. त्याला उत्तर देत अध्यात्मिक गुरु श्री श्री रवीशंकर यांनी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसींवर जोरदार टीका केली आहे.