‘मोदी सरकार काही राज्यांतील सरकार ठरवून पाडतय, त्यामुळे निवडणूक जिंकणं हे हरण्यासारखचं आहे’

rahul gandhi vs narendra modi

तिरुअनंतपूरम : पुदुचेरी विधानसभेचा कार्यकाळ २१ जून २०२१ रोजी संपणार आहे. पण कार्यकाळ संपण्यासाठी जेमतेम चार महिने उरले असताना पुदुचेरीत अस्थिरता निर्माण झाली. मुख्यमंत्री नारायणसामी बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरले आणि काँग्रेसचे सरकार पडले. नारायणसामी यांनी मुख्यमंत्रीपदाचा पदाचा राजीनामा दिला.

बहुमत ठराव सादर करण्यासाठी एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं होतं.यात नारायणसामी सरकारचा पराभव झाला.विधानसभेत बहुमत सिद्द न झाल्याने काँग्रेसचे मुख्यमंत्री नारायणसामी यांनी आपला राजीनामा नायब राज्यपालांकडे पाठवला आणि आता ते पायउतार झाले आहेत. यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष व खासदार राहुल गांधी यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे.

‘मोदी सरकार काही राज्यांतील सरकार ठरवून पाडत आहे,’ असा आरोप राहुल गांधींनी केलाय. ‘स्वातंत्र्यांनंतर पहिल्यांदाच निवडणुका जिंकणं म्हणजे निवडणुका हारण्यासारख आहे, तसेच निवडणुका हारणं म्हणजे जिंकण्यासारखं आहे,’ अशी टीका देखील राहुल गांधींनी केली आहे. तर, न्यायालयांच्या निकालांवरून देखील त्यांनी भाजपला लक्ष्य केलं आहे.

‘दिल्लीमध्ये पहिल्यांदाच असं सरकार आलंय की जे आपल्या सत्तेचा गैरवापर करुन आपल्या इच्छा न्यायालयावर लादत आहे. न्यायपालिकेला जे करायचं आहे ते त्यांना करता येत नाही. केवळ इतकंच नाही तर विरोधी पक्षांना लोकसभा आणि राज्यसभेत आपला आवाज उठवू दिला नाही,’ असा घणाघात देखील गांधींनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या