Share

ओ वाचवा…वाचवा..! ड्रायव्हर त्रास देतोय ! पुण्यात बसमध्ये प्रवाशाचा गोंधळ ; VIDEO व्हायरल

Viral Video Pune | पुणे : पुण्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला दिसत आहे. बसमधील या व्हिडिओमध्ये एक प्रवासी बसमध्ये आरडाओरडा करताना दिसत आहे. मला वाचवा, चालक माझं अपहरण करत आहे, अशी आरडाओरड प्रवाशाकडून सुरू आहे. बस चालक उतरू देत नसल्यानं प्रवाशानं बोंबाबोंब केली. त्यावेळी बसमधील प्रवाशानं व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे.

पीएमपीएमएलच्या बसमध्ये हा प्रकार घडला. ही बस चिंचवडहून बालेवाडीला जात होती. दोन स्टॉपच्या मध्ये एका ठिकाणी बस थांबली. त्यावेळी एका प्रवाशानं दरवाजा उघडण्यास सांगितलं. त्यावर बसचा दरवाजा केवळ स्टॉपवरच थांबेल बस चालकांकडून सांगण्यात आलं. मात्र त्या प्रवाशाला त्याच ठिकाणी उतरायचं असल्यानं त्यानं आग्रह करत आरडाओरड सुरु केली. त्यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. हे प्रकरण पुढे शिवीगाळ करण्यापर्यंत पोहोचलं.

व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल | Viral Video Pune

प्रवासी बस चालकाला शिवीगाळ करू लागला. डॅशबोर्डवर हात मारू लागला. बसमधील इतर प्रवाशांनी त्याला शांत राहण्यास सांगितलं. मात्र त्यानं कोणाचं ऐकलं नाही. त्यानं आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. ‘ओ वाचवा, बस चालक त्रास देतोय. उतरु देत नाही. चालक अपहरण करतोय,’ अशी आरडाओरड प्रवाशानं केली. त्याचा आवाज ऐकून आसपासचे लोक बसजवळ गोळा झाले.  ( Viral Video Pune )

यानंतर चालकानं बस सुरू केली आणि ती थेट स्टॉपवरच थांबवली. मात्र या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. समाजमाध्यमांवर या व्हिडीओला शेअर करत अनेक कमेंट्स लोकं करत आहेत.

महत्वाच्या बातम्या :

Viral Video Pune | पुणे : पुण्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला दिसत आहे. बसमधील या व्हिडिओमध्ये एक …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Pune Travel Video

Join WhatsApp

Join Now