अण्णा फार ताणू नका,राज ठाकरेंचा हजारे यांना सल्ला

टीम महाराष्ट्र देशा- लोकपाल कायद्याच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी बेमुदत उपोषणाला बसलेल्या अण्णा हजारे यांना विविध स्तरांतून पाठिंबा मिळत आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रसिद्धीपत्रक काढून अण्णांना पाठिंबा दिल्यानंतर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राळेगणसिद्धी इथं जाऊन अण्णांची भेट घेतली.

पाठींबा देण्यासाठी गेलेल्या राज ठाकरे यांनी सरकारवर तोफ डागली. अण्णांच्या आंदोलनामुळे नरेंद्र मोदी सत्तेत आलं असल्याचं ते म्हणाले.कृतघ्न माणसांसाठी कुठे जीवाची बाजी लावता अण्णा फार ताणू नका असा सल्ला राज ठाकरे यांनी हजारे यांना दिला.

दरम्यान, मोदींनी डिसेंबर 2013 मध्ये लोकपालबाबत ट्वीट केलं होतं, पाच वर्षांत लोकपालबाबत काहीच कार्यवाही झाल्याचं ठाकरे यांनी निदर्शनास आणून दिलं.तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील या आंदोलना यायला पाहिजे होतं असं देखील ते म्हणाले