निपाह व्हायरसला आळा घालण्यासाठी ऑस्ट्रेलियामधून मागवली औषधे

blank

कोझिकोडे: भारतात निपाह व्हायरसने थैमान घातल आहे. या व्हायरसची लागण झाल्याने केरळच्या कोझिकोडमध्ये आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, केंद्र सरकारने या प्रकरणाची तातडीने दखल घेतली आहे. केरळमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या निपाह व्हायरसचा सामना करण्यासाठी आता आरोग्य खात्याने जपान आणि ऑस्ट्रेलियामधून औषधे मागवण्याचा निर्णय घेतला आहे.

एनआयव्ही व्हायरसला अटकाव करणाऱ्या या औषधाच्या ऑस्ट्रेलियात घेण्यात आलेल्या चाचण्या यशस्वी ठरल्या आहेत. आज रात्रीपर्यंत कोझिकोडेमध्ये ही औषधे पोहोचतील अशी माहिती आहे. केरळच्या कोझिकोडेमध्ये निपाह व्हायरसमुळे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. हयुमन मोनोक्लोनल अँटीबॉडी एम १०२.४ हे औषध ऑस्ट्रेलियाहून मागवण्यात आले असू,न ते आज रात्रीपर्यंत कोझिकोडेमध्ये पोहोचेल.

1998-99 सालामध्ये हा आजार पसरला तेव्हा जवळपास 265 जणांना या आजाराची लागण झाली होती, असं बोललं जातं. रुग्णालयांमध्ये दाखल झालेल्या जवळपास 40 टक्के रुग्णांना गंभीर आजार झाला होता, ज्यामुळे त्यांना वाचवता आलं नाही. सर्वसाधारणपणे वटवाघूळ, डुक्कर किंवा मनुष्यांद्वारे हा आजार पसरतो. मलेशिया आणि सिंगापूरमध्ये डुक्करांच्या माध्यमातून हा आजार पसरल्याचं समजलं होतं, तर भारत आणि बांगलादेशमध्ये मनुष्यांपासूनच या आजाराचा संसर्ग होण्याची भीती जास्त आहे.