कॉंग्रेस मधून इच्छुकांची संख्या वाढली, तीन राज्यातील विजयांचा परिणाम

टीम महाराष्ट्र देशा – नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत तीन राज्यात कॉंग्रेस पक्षाला विजय मिळाला आहे. या तीन राज्यातील विजयामुळे कॉंग्रेस पक्षात चैतन्य आले आहे. भारतीय जनता पक्षात मोदी-शाह यांची लाट सुरु झाल्यापासून कॉंग्रेस पक्षाला सतत पराभवाचे धक्के बसत होते. त्यामुळे संपूर्ण देशभर कॉंग्रेस पक्षाचा भाव घसरला होता.

नुकत्याच झालेल्या पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीत कॉंगेस पक्षाला मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या तीन राज्यात सत्ता मिळाली आहे. या तिन्ही राज्यात यापूर्वी भाजपाचे मुख्यमंत्री होते. विधानसभा निवडणुकीतील कॉंग्रेसच्या या विजयामुळे मात्र देशभरातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या मनात मात्र चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. याचाच परिणाम म्हणजे लोकसभा-विधानसभा निवडणुकांसाठी कॉंग्रेस मधील इच्छुकांची संख्या वाढली आहे.