मुंबई : मागील काही दिवसांपूर्वी नागपूरमधील एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याचे बघायला मिळाले. नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील बाम्हणी या गावात डान्स हंगाम कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात कलाकारांनी अश्लील नृत्य केल्याचा हा व्हिडीओ असून या व्हिडिओवर सर्व स्तराहून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, याच मुद्द्यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ आक्रमक झाल्या असून सरकारनं सर्व लाज शरम वेशीवर टांगलीय का?, असा सवाल त्यांनी केला आहे.
यासंदर्भात चित्रा वाघ यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये त्या म्हणाल्या आहेत की,’यापूर्वी पुरोगामी महाराष्ट्रात अशक्य गोष्टी या सरकारच्या छत्राखाली शक्य झाल्या आहेत आणि ते ही शाहू,फुले,आंबेडकरांचे नाव घेऊन. सत्ता चालवणारे असतांना देखील सरकारच्या नाकाखाली महिलांना नग्नावस्थेत डान्स करायला लावला जातोय ते ही उघडपणे. सरकारनं पोलिस यंत्रणेनं सर्व लाज शरम वेशीवर टांगलीय का?’
राष्ट्रवादीचे दिवंगत नेते RR आबांचे स्वप्न होतं की डान्स बार बंद करून चुकीच्या मार्गानं जाणा-या तरूणाईला योग्य दिशा दाखवावी..पण आत्ता महाविकास आघाडीकडून आणि सत्तेतील राष्ट्रवादीकडून त्यांच्याच स्वप्नांना तिलांजली देण्याचा प्रकार नागपूर ग्रामीण भागांत घडलाय…(२/२)
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) January 22, 2022
दरम्यान, पुढे त्या म्हणाल्या की,’राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर.आर. आबांचे स्वप्न होतं की, डान्स बार बंद करून चुकीच्या मार्गानं जाणा-या तरूणाईला योग्य दिशा दाखवावी. परंतु आता महाविकास आघाडीकडून आणि सत्तेतील राष्ट्रवादीकडून त्यांच्याच स्वप्नांना तिलांजली देण्याचा प्रकार नागपूर ग्रामीण भागात घडला आहे’, असे वाघ म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- बाळासाहेबांचे आयुष्य म्हणजे कृतींनी गजबजलेले मनोहारी नाट्य- संजय राऊत
- “ही परिस्थिती १९९४ सारखीच, तेव्हा माझ्या वडिलांना…”; उत्पल पर्रीकरांची धक्कादायक माहिती
- “मी ज्ञानदान करतो, पैसा देण्याचं काम माझं नाही”, डिसले गुरुजींचे शिक्षणाधिकाऱ्यांना प्रत्युत्तर
- “शिवसैनिक कुठे आहेत त्यांनी पुढे यावं”, भोकरमध्ये अशोक चव्हाणांनी घडवले आघाडीच्या एकीचे दर्शन
- “विचार आणि उच्चारांत सत्यता, स्पष्टता, पारदर्शकता असलेले नेते बाळासाहेब ठाकरे”