१६ मेगापिक्सल्सच्या फ्रंट कॅमेर्‍याने सज्ज नुबिया एम२ लाईट

नुबिया कंपनीने भारतात एम या श्रेणीला सादर करतांना पहिल्यांदा एम२ लाईट हे १६ मेगापिक्सल्सच्या फ्रंट कॅमेर्‍याने युक्त असणारे मॉडेल लाँच केले आहे.

अलीकडे फ्रंट कॅमेर्‍यांवर कंपन्यांनी विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. नुबिया एम२ लाईट या मॉडेलमध्ये तब्बल १६ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यात इनबिल्ट एलईही फ्लॅश तसेच ७९.८ अंशाचा वाईड लेन्स प्रदान करण्यात आला आहे. यासोबत यासाठी नऊ ब्युटी मोड आणि तब्बल ९० मॉड प्रदान करण्यात आले आहेत. तर यातील रिअर कॅमेरा १३ मेगापिक्सल्स क्षमतेचा असेल. यात ५.५ इंच आकारमानाचा आणि १२८० बाय ७२० पिक्सल्स क्षमतांचा डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. ऑक्टा-कोअर मीडियाटेक एमटी६७५० प्रोसेसरने सज्ज असणार्‍या या मॉडेलमध्ये चार जीबी रॅम व ३२ जीबी इनबिल्ट स्टोअरेज असून ते मायक्रो-एसडी कार्डने १२८ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. हे मॉडेल अँड्रॉइडच्या मार्शमॅलो या आवृत्तीवर चालणारे असून यावर कंपनीचा नुबिया युआय ४.० हा इंटरफेस प्रदान करण्यात आला आहे. तर यात ३००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी प्रदान करण्यात आली आहे. हा स्मार्टफोन अमेझॉन इंडिया या ई-पोर्टलवरून उपलब्ध करण्यात आला आहे.