fbpx

नीट परीक्षेचा निकाल ; सार्थक भट राज्यात पहिला

पुणे : वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी घेतल्या जाणाऱ्या नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून देशात राजस्थानच्या नलीन खंडेलवाल ९९.९९ पर्सेन्टाइल आणि ७०१ गुण मिळवून देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. महाराष्ट्रात सार्थक भट याने प्रथम आणि देशात सहावा क्रमांक मिळवला आहे.

सार्थकला ६९५ गुण मिळाले आहेत. राज्यात साईराज माने याने दुसरा तर सिद्धार्थ दाते याने तिसरा पटकावला. मुलींमध्ये देशात तेलंगणा येथील माधुरी रेड्डी हिने प्रथम क्रमांक मिळवला आहे तर दिशा अगरवाल हिने महाराष्ट्रात मुलींमध्ये प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.

NEET -२०१९ या परिक्षेसाठी १५,१९,३७५ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी ७,९७,०४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. ५ मे रोजी नीट परीक्षा घेण्यात आली होती. परंतु फॅनी वादळाच्या तडाख्यामुळे कर्नाटकातील विद्यार्थ्यांसाठी २० मे रोजी पुन्हा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.