सावरकरांच्या पुतळ्याला एनएसयूआयच्या विद्यार्थ्यांनी घातला चपलेचा हार

टीम महाराष्ट्र देशा:- कॉंग्रेसप्रणीत नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाने (एनएसयूआय) दिल्ली विद्यापीठातील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याला चपलेचा हार घातल्याचा व सोबतच त्यांच्या पुतळ्याला काळे फासण्याचा निंदनीय प्रकार समोर आला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांनी हा निंदनीय प्रकार केल्याचे उघड झाले आहे. या प्रकारामुळे दिल्ली विद्यापीठात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे . त्यामुळे एनएसयूआयच्या या कृत्याबद्दल देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (एबीव्हीपी) विद्यापीठाच्या कॅम्पसमधील कला शाखेच्या गेटजवळ वीर सावरकर, सुभाष चंद्र बोस आणि भगत सिंह यांचा पुतळा उभारला होता. शक्ती सिंग आणि सिद्धार्थ यादव यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम झाला होता. यावर एनएसयूआय आणि डाव्या विद्यार्थी संघटनानी विरोध करत हा पुतळा विनापरवानगी बसवण्यात आल्याने तो हटवण्याची मागणी केली होती. दरम्यान या प्रकरणात एनएसयूआय व एबीव्हीपी आमनेसामने आले होते. यातूनच हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
पवारांना सतावतेय पाकिस्तानातील मुस्लिमांची चिंता,म्हणाले....
...तर भाजप - मनसे एकत्र येऊ शकतात; पाटलांनी दिले युतीचे संकेत
'हिंसक वळण लावणारे, तोडफोड करणारे कार्यकर्ते हे वंचित बहुजन आघाडीचे नाहीत'
'एमआयएम'ने आजपर्यंत सगळ्यांनाच शिंगावर घेतलयं, मनसेला घाबरत नाही
मनसेच्या संघटना बांधणीची जबाबदारी बारामतीकराच्या खांद्यावर
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
पुन्हा मोदी सरकार येणार व मी पुन्हा मंत्री होणार : रामदास आठवले
सावधान : मुंबई आणि पुण्यातही आढळले‘कोरोना'चे संशयित रुग्ण