आता रेल्वे मध्ये मिळणार तुमच्या आवडीच जेवण; रेल्वेस्टेशनवर केटरिंग सेवा सुरु होणार

रेल्वेस्टेशनवर केटरिंग सेवा

नई दिल्ली: भारतीय रेल्वेने देशातील काही निवडक रेल्वे स्टेशनवर ई- केटरिंग सेवा सुरु करण्यासाठी परवानगी दिली आहे. ही केटरिंग सेवा केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या अंतर्गत येणाऱ्या अधिकृत एजन्सी कडून जारी करण्यात आलेल्या आरोग्य नी सुरक्षा संबंधित नियमांचं पालन करून सुरु करण्यात येणार आहे.

IRCTC ने रेल्वे बोर्डला काही निवडक रेल्वे स्टेशनवर ई- केटरिंग सेवा सुरु करण्यासाठी पत्र लिहिले होते. याला उत्तर देताना रेल्वेने या केटरिंग सेवा सुरु करण्यासाठी संमती दर्शवली आहे. आता आईआरसीटीसी ला यासाठी अभ्यास करून कर्मचाऱ्यांची उपलब्धता आणि स्थानिक सेवांच्या आधारे ई-केटरिंग सेवा पुन्हा सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात येईल.

कोरोना संक्रमण काळात रेल्वे कडून सुरुवातीला सर्व रेल्वे बंद करण्यात आल्या होत्या. तर त्यामुळे ई-केटरिंग सेवा देखील बंद झाली होती. तर आता पुन्हा ही सेवा सुरु होणार असल्याने प्रवाशांना आपल्या आवडीचे जेवण पुन्हा मिळणार आहे.

महत्वाच्या बातम्या