आता नवीन आरोप होण्याची वाट पाहत आहे: एकनाथ खडसे

eknath khadse

विरोधी पक्षात असताना माझ्यावर कोणतेही आरोप झाले नाहीत. मात्र सत्तेत आल्यावर मंत्रीपद मिळाल्यानंतर असे काही आरोप सुरु झाले आहेत. कि ते थांबण्याच नावच घेत नसल्याची उद्विग्न प्रतिक्रिया माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पुण्यात बोलताना दिली आहे. खडसे यांना पुण्यातील जाधवर इन्स्टिटयूटतर्फे जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी ते बोलत होते.

पुढे खडसे म्हणाले कि, आजवर आपल्यावर अनेक आरोप झाले. त्याच्या चौकशीही झाल्या मात्र आरोपांत काहीच तथ्य आढळले नाही. आता नव्या आरोपाची वाट पाहत आहे. आज जेष्ठ नेते गोपीनाथ मुंडे हयात असते तर राजकारणाची दिशा वेगळी असती अस सुचक विधान त्यांनी केल आहे.

माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे , शिक्षणतज्ञ एन.सी.जोशी, पत्रकार सुरेश चव्हाण आदी मान्यवरांचा सन्मान जाधवर इन्स्टिट्यूटकडून करण्यात आला आहे. यावेळी पेट्रोल डिझेल वर जे कर लादण्यात आले आहेत. त्यात कोणताही नवा कर लादण्यात आला नसून जे कर आहेत ते आधीच्या सरकारनेच लावलेले आहेत अस म्हणत पेट्रोल डिझेल दर वाढीचं खापर खडसे यांनी कॉंग्रेस सरकारवरच फोडलं आहे.