जालना : तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोतकर यांची मनधरणी केली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही माघार घेण्याचा आदेश दिल्याने खोतकर यांनी माघार घेतली. ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनी दगा दिला. पूर्वी अर्जुन चक्रव्हीव्हात फसले होते. आता अभिमन्यू सतर्क आहे. अर्जुनराव खोतकर योद्धे असून त्यांनी डरकाळी फोडली आहे. आता वाट पाहा, अशा शब्दात अब्दुल सत्तार यांनी विरोधकांना आवाहन दिले आहे.
जालना शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात बुधवारी शिवसेना – युवा सेना कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता या वेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेना नेते तथा माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा जोतीताई ठाकरे, जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर, ए. जे. बोराडे, माजी आमदार संतोष सांबरे, अभिमन्यू खोतकर, भाऊसाहेब घुगे, बाबासाहेब इंगळे, भाऊसाहेब पाउलबुधे, पंडित भुतेकर, विष्णू पाचफुले आदिची उपस्थिती.
सत्तार म्हणाले की, मागील दगाफटका लक्षात घेता आता कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास पक्का आहे. माझ्या डोक्यावरची टोपी हे माझे ओझे असून हे ओझे उतरविण्यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करावे लागेल असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
महत्वाच्या बातम्या
- परिसराची स्वच्छता हाच बर्ड फ्ल्यू टाळण्याचा मंत्र
- आंदोलकांनी आडमुठी भूमिका न घेता न्यायालयाचा निर्णय स्विकारून आंदोलन मागे घ्यावे : बोंडे
- आगामी महिला क्रिकेट टीम तयार होतेय? धोनीची मुलगी कॅप्टन! बिग बींचे ट्विट
- कोरोनाचे संकट दूर होऊ दे…सोलापूरचे वैभव पुन्हा येऊ दे; भरणे यांचे सिद्धरामेश्वरांकडे साकडे
- विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त सभा, मिरवणुकीला परवानगी नाही